Tag: लसून पाकळ्या

भारतीय पाककृती- सुरमई फ्राय

Click here to see Surmai Rava Fry Fish Recipe in English

भारतीय पाककृती||सुरमई फ्राय

Surmai Fish Fryसाहित्य :-

 • अर्धा  किलो  सुरमई
 • थोडीशी  चिंच
 • १०-१२  लसून  पाकळ्या,  १  इंच  आलं
 • १  चहाचा  चमचा  लाल  तिखट
 • हळद -१/२  टी  स्पून
 • चवीनुसार  मीठ
 • १ वाटी   ज्वारीचे  पीठ
 • रवा –गरजेनुसार
 • तळण्याकरता  तेल

कृती :-

 • सुरमईचे  सगळे तुकडे  स्वच्छ  धुवून   घ्यावेत.
 • चिंचेचा  कोळ  काढून  घ्यावा.
 • चिंचेचा  कोळ, वाटलेली  आलं,  लसून,  हळद, १ चमचा लाल तिखट  व चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून  सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूने चोळून घ्यावे व ३-४ तास झाकून ठेवावे.
 • फ्राय  करायच्या  वेळी  ज्वारीच्या  पिठात  रवा  मिक्स  करून  नंतर  सर्व  तुकडे  लावलेल्या  मासाल्यासकट दोन्ही  बाजूने  घोळवून  फ्रायिंग  पॅनमध्ये  पुरेसे  तेल  घालून  एका  वेळेला  २-३ तुकडे  लावून  दोन्ही बाजूने  खरपूस  तळावेत.
 • गरमागरम सुरमई  फ्राय  सर्व्ह  करण्यासाठी  तयार  असतील.


टीप :-

 • कोणताही  मासा  धुताना  लिंबाचा  रस  व  पाण्यात  खळखळून  स्वच्छ  धुवावेत  म्हणजे  शिळेपणा  व माशाचा  वास  कमी  होतो.
 • फ्राय  करताना  लिंबुरस  किंवा  व्हिनीगर  चिंचेच्या  ऐवजी  उपयोगात  आणता  येईल.  पण  चिंचेमध्ये मुरलेल्या  फिशाची चव  चांगली  लागते.
तर काय मंडळी, बनवणार का सुरमई फ्राय..? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Surmai Rava Fry Fish Recipe in English

You may also interested in,


मसाले भात-भारतीय पाककृती

Click here to see Masala Bhath (Masale/Spicy rice) recipe in English

 

भारतीय पाककृती- मसाले भात

मसाले भातसाहित्य :-

 • दोन  वाट्या  उत्तम  प्रतीचे  जुने  तांदूळ  किंवा  बासमती  तुकडा
 • पाव  किलो  फ्लॉवर
 • एक  वाटी  मटारचे  दाणे
 • एक  वाटी  गाजर
 • एक  वाटी  श्रावण  घेवडा  देठ  काढून  उभा  तिरका  चिरून
 • एक  वाटीभर  खवलेला  नारळ [optional]
 • मुठभर  चिरलेली  कोंथिबीर
 • एक  डावभर  तेल
 • फोडणीचे  साहित्य :- ५-६ कढीलिंबाची  पाने
 • मसाला :- 1 स्पून  सुके  खोबरे,  एक  टे. स्पून  पांढरे  तीळ,  तीन  चार  लवंगा,  दोन  दालचिनीचे  तुकडे, दोन  मसाला  वेलदोडे,  एक  चमचा  जिरे,  ३-४  हिरव्या  मिरच्या.
 • मीठ  चवीनुसार
 • चीमुठ्भर  हळद
 • अर्धा  इंच  आले,  ५-६  लसून  पाकळ्या  वाटून  ( ऐच्छिक)
 • एक  मुठभर  काजू  पाकळी.

कृती :-

 • मसाले  भात  करण्यापूर्वी  तांदूळ  स्वच्छ  निवडून,  धुवून  निथळत  ठेवावेत.  तांदळाच्या  दुप्पट  पाणी पातेल्यात  उकळून  ठेवावे.
 • फ्लॉवरचे  तुरे  काढून  सोलावे,  गाजर  सोलून  मधला  दांडा  काढून  एक  उंचाचे  उभे  तुकडे  करावेत.  मटार सोलून  घ्यावेत.
 • घेवडा  देठ  काढून  उभा  तिरका  चिरावा.
 • सर्व  भाज्या  एकत्र  करून  धुवून  घ्याव्यात.
 • मसाल्याचे  सर्व  जिन्नस  अर्धा  चमचा  तेल  घालून  कढईत  खमंग  भाजून  घ्यावेत  व  कुटावेत.
 • जाड  बुडाच्या  पातेल्यात  डावभर  तेलाची  फोडणी  करून  त्यात  ५-६ कढीलिंबाची  पाने  आणि  आलं लसून  पेस्ट  घालावे.  ते  परतलं  गेलं  की  धुवून  ठेवलेल्या  सर्व  भाज्या  फोडणीत  घालावे.  भाज्या चांगल्या  परतून  झाल्या  की,  काजू  पाकळी  घालावी.  त्यावर  धुवून  ठेवलेले  तांदूळ  घालावेत.  तांदूळ फोडणीत  चांगले  परतावे,  त्यात  कुटलेला  मसाला  घालून  थोडा  परतून  उकळते  पाणी  घालावे.
 • चवीनुसार  मीठ  आणि  हळद  घालावे.
 • भाताला  चांगली  उकळी  आली  की,  गॅस  मंद  करावा  व  पातेल्याखाली  तवा  घालून  मंद  आचेवर  भात शिजल्यावर  उलथन्याने  एक – दोन  वेळा  ढवळावा.
 • वरील  भाताचे  भांडे  सध्या  कुकरमध्ये   घालून  मसाले  भात  शिजवायला  हरकत  नाही.  पण  कुकरचे झाकण  उघडून  एक  दोनदा  उलथन्याने  हलक्या  हाताने  ढवळावा,  नाहीतर  मसाला  व  भाज्या  भातात नीट  न  मिसळता  भात  शिजल्यावर  त्याचा  थर  भातावर  जमा  होतो.
 • मसाले  भात  वाढताना  आवडत  असेल  तर  खोबरे,  कोंथिबीर  घालून  साजूक  तूप  घालून  वाढावा.

दक्षता :-

 • मसाले  भातात  आपल्या  आवडीनुसार  इतर  भाज्या  वापरण्यास  हरकत  नाही.  आवडीनुसार  पानकोबी  बारीक  चिरून,  भोपळी  मिरची,  वांग्याचे  मोठे  तुकडे,  बटाट्याचे  तुकडे  घालावेत.
तर काय मंडळी, संध्याकाळी बनवणार का खमंग मसाले भात…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Masala Bhath (Masale/Spicy rice) recipe in English

 

You may also interested in,